Wednesday, September 13th, 2023

एलियन्स … कल्पना नव्हे वास्तव ! मेक्सिकोच्या संसदेत अवतरले एलियन्स

गेल्या अनेक दशकांपासून पृथ्वीवरील मानवाला असे वाटत आले आहे की या विश्वात अन्यही काही जीव आहेत जे आपल्याला पाहात आहेत. कोणी त्याला एलियन्स म्हणतात तर कोणी परग्रहवासी. हाच विषय घेऊन अनेक कथा-कादंबऱ्या लिहिल्या गेल्या, चित्रपट बनले पण तरीही सामान्य माणसाला मात्र या सर्व भाकडकथाच वाटत आल्या आहेत. मात्र आज या सर्वांना छेद देणारी घटना घडली आहे. मेक्सिकोच्या संसदेत पेरूमध्ये सापडलेले एक हजार वर्षांपूर्वीच्या एलियन्सचे गोठवलेले मृतदेह सादर केले गेले आणि सर्वांना प्रचंड धक्का बसला. ज्या चर्चा लोक इतके वर्ष नुसते ऐकत होते त्याची प्रत्यक्ष साक्ष आज लोकांनी डोळ्यांनी पाहिल्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.

प्रसिद्ध पत्रकार आणि UFO विशेषज्ञ जैमे मौसान यांनी या सर्व मोहिमेचे नेतृत्व केले. हे दोन्ही मृतदेह लहान आकाराचे असून त्यांचा आकार मानवी शरिरासारखा आहे. इजिप्तमधील ममीसारख्या प्रकारे हे दोन्ही मृतदेह गोठवून ठेवले आहेत. हे एलियन्स सर्व जगासमोर प्रथमच आले आहेत. त्यामुळे संपर्ण जगभरात यावर एकच चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वीही अमेरिकेच्या प्रशासनातील एका वरिष्ठ व्यक्तीने अमेरिकेच्या सरकारकडे एलियन्सविषयी माहिती असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर आता प्रत्यक्ष हे मृतदेहच समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *