पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारत भारत आज विजयी झाला. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला तब्बल २२८ धावांनी हारवत भारतीय संघ विजयी ठरला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत निर्धारित ५० षटकांत ३५६ धावा केल्या. तर त्या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची पुरती दमछाक झाली. पाकिस्तानचा संपूर्ण संघ केवळ १२८ धावा करून गारद झाला. भारताकडून कर्णधार विराट कोहली याने नाबाद १२२ धावा केल्या तर के. एल. राहूल याने १११ धावा केल्या. तर कुलदीप यादव याने केवळ २५ धावा देत तब्बल ५ गडी बाद केले. विराट कोहली मॅन ऑफ द मॅच ठरला.
Swabodh > बातम्या > क्रिडाविश्व > पाकिस्तानला पुन्हा एकदा चारली धूळ… आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत विजयी