जी-२० शिखर परिषदेमुळे भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांमध्ये उत्साह आल्याचे आज दिसून आले. बाजारात अत्यंत सकारात्मक वातावरण पाहावयास मिळाले. निफ्टी ५० या निर्देशांकाने इतिहासात प्रथमच २० हजाराचा ऐतिहासिक टप्पा पार केला. तर सेन्सेक्सनेही ६७ हजारांची पातळी ओलांडली आणि निर्देशांकाची मजबूती दाखवून दिली. भारत जी-२० परिषदेच्या अध्यक्षस्थानी होता आणि या परिषदेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले ज्याचा परिणाम शेअर मार्केटवर झाला.
Celebration of Nifty50 touching 20000 points at NSE HO, today along with our MD & CEO, Shri @AshishChauhan and with senior officials of NSE. #NIFTY50 #Index #Options #Futures #trading #Derivatives #FNO #NSEIndia pic.twitter.com/eH18ApE3tj
— NSE India (@NSEIndia) September 11, 2023