विक्रमवीर नोव्हाक जोकोविच, २४व्या ग्रँडस्लॅमवर नाव कोरणारा एकमेव खेळाडू

महिला एकेरीत कोको गॉफने अवघ्या १९ व्या वर्षी पटकावले पहिले ग्रँडस्लॅम

अमेरिकन ओपनमध्ये दुहेरी विक्रम : जोकोविचचे २४ वे ग्रँडस्लॅम तर कोकोचे अवघ्या १९व्या वर्षी ग्रँडस्लॅम

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात नोव्हाक जोकोविचने २४ व्या ग्रँडस्लॅमला गवसणी घातली आणि एक नवा विक्रम स्थापित केला. २४ व्या ग्रँडस्लॅम पदकावर नाव कोरणारा नोव्हाक हा जगातील एकमेव टेनिसपटू ठरला आहे. या विक्रमाबरोबरच अमेरिकन ओपन स्पर्धेवर नोव्हाकने चौथ्यांदा नाव कोरले आहे. अंतिम सामन्यात नोव्हाकनं डॅनिल मेदवेदेवचा तीन सेटमध्ये पराभव केला.

तर दुसरीकडे महिला एकेरी स्पर्धेत कोको गॉफने वयाच्या केवळ 19व्या वर्षी इतिहास घडवला आहे. कोकोने महिला एकेरीत बेलारूसच्या आर्यना सबालेंकाला हरवत पदकाला गवसणी घातली. कोकोचे हे पहिलेच ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. सेरेना विल्यम्सनंतर अमेरिकन ओपन जिंकणारी ती पहिली अमेरिकन टीनएजर ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *