नवी दिल्लीत G-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सिंगापूर, बांगलादेश, इटली, अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना, मॉरिशस आणि संयुक्त अरब अमिरातीच्या प्रमुखांनी 9 सप्टेंबर 2023 रोजी जागतिक जैवइंधन आघाडीची स्थापना केली.
The launch of the Global Biofuels Alliance marks a watershed moment in our quest towards sustainability and clean energy.
I thank the member nations who have joined this Alliance. https://t.co/3wgUkmKCyA pic.twitter.com/MOmP1q6g2r
— Narendra Modi (@narendramodi) September 9, 2023
G-20 च्या अध्यक्षपदावरून जागतिक जैव इंधन आघाडी (GBA) स्थापन करण्याबाबत भारताने पुढाकार घेतला आहे. तंत्रज्ञानातील प्रगती सुलभ करून, शाश्वत जैवइंधनाचा अधिकाधिक वापर, मजबूत प्रमाणीकरणाची घडी बसवत आणि सर्व संबंधितांच्या व्यापक सहभागाने प्रमाणीकरण या माध्यमांतून जैवइंधनाच्या जागतिक वापरात वाढ करण्याचा हेतू या आघाडीने ठेवला आहे. ही आघाडी केंद्रीय ज्ञान भांडार आणि तज्ञ केंद्र म्हणूनही काम करणार आहे. GBA जागतिक जैव इंधन आघाडीचे उद्दिष्ट एक उत्प्रेरक व्यासपीठ म्हणून काम करणे तसेच जैवइंधनाच्या प्रगतीसाठी आणि व्यापक स्विकारार्हता वाढवण्यासाठी जागतिक सहकार्य वाढवणे हा आहे.