G-20 राष्ट्रप्रमुखांनी राजघाटावर महात्मा गांधी यांना अर्पण केली आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि G-20 सदस्य राष्ट्रांच्या नेत्यांनी आज ऐतिहासिक राजघाटावर महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. गांधीजींचे कालातीत आदर्श सुसंवादी, समावेशक आणि समृद्ध जागतिक भवितव्यासाठी सामुदायिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. गांधीजींचे कालातीत आदर्श आमच्या सामुदायिक दृष्टीकोनातून सुसंवादी, समावेशक आणि समृद्ध जागतिक भवितव्यासाठी मार्गदर्शन करतात अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांचे महत्त्व आलेल्या मान्यवरांसमोर मांडले.

पंतप्रधानांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले की:

“शांतता, सेवा, करुणा आणि अहिंसेचे दीपस्तंभ असलेल्या महात्मा गांधी यांना ऐतिहासिक राजघाटावर G-20 परिवाराने आदरांजली वाहिली.

राष्ट्रांची वैविध्ये एकत्र येत असताना, गांधीजींचे कालातीत आदर्श आमच्या सामुदायिक दृष्टीकोनातून सुसंवादी, समावेशक आणि समृद्ध जागतिक भवितव्यासाठी  मार्गदर्शन करतात.”

 

पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले की:

“G-20 परिवार बापूंना आदरांजली अर्पण करत आहे. जागतिक नेत्यांनी राजघाटाला भेट देत महात्मा गांधी यांच्या समाधीला  आदरांजली अर्पण केली.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *