पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाची 9 वर्षे पूर्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी,‘मन की बात’ या आपल्या मासिक रेडीओ कार्यक्रमाला आज 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने मन की बात मध्ये समाविष्ट असलेल्या काही महत्वपूर्ण संकल्पना आणि त्यांचा सामाजिक परिणाम यावर प्रकाश टाकणारा अभ्यास सामायिक केला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयआयएम बेंगळुरू यांनी केलेल्या संशोधन कार्यात पंतप्रधानांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या 105 भागांच्या प्रभावाचे विश्लेषण करण्यात आले आहे.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

“आज,मन की बातला 9 वर्षे पूर्ण होत असताना, स्टेट ऑफ बँक ऑफ इंडिया आणि भारतीय व्यवस्थापन संस्था, बेंगळुरू यांचा एक चित्तवेधक अभ्यास प्रसिद्ध केला आहे. या अभ्यासात या कार्यक्रमातील महत्वपूर्ण संकल्पना आणि त्यांचे सामाजिक परिणाम यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या माध्यमातून आपण जिवनाची वाटचाल आणि सामूहिक प्रयत्नांचे उत्सव कसे साजरे केले हे जाणून घेणे विस्मयकारक आहे.

https://x.com/narendramodi/status/1709138871651328063

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *