जिहादी हल्ल्यांपासून संरक्षणासाठी पुण्यातील 5000 हिंदू शस्त्रास्त्र परवाना मागणार

जिहादी हल्ल्यापासून जीव वाचवण्यासाठी हिंदूंना शस्त्र परवाना तातडीने मिळावा, ‘एलआरओ’ची मागणी

पुणे, दि. 8 जुलै : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पूर्व पुण्यात येरवडा, वडगाव शेरी, लोहियानगर, नागपूर चाळ, विमाननगर परिसरात हिंदूंवरील जिहादी हल्ल्यांत वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यातही हिंदू-मुस्लिम एकत्र राहात असलेल्या वस्त्यांमध्ये हिंदूंना ठरवून लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर अशा वस्तीत राहणाऱ्या हिंदूंना संरक्षण पुरवण्यात व जिहादी गुन्हेगारांवर कारवाई करण्यात पुणे पोलिस कमी पडत असल्यामुळे तेथील हिंदूंना शस्त्र परवाने तातडीने मिळावेत अशी मागणी लीगल राईट्स ऑब्झर्वेटरीकडून करण्यात आली आहे. जिहादी हल्ल्यापासून मौल्यवान हिंदू जीव वाचवण्यासाठी बंदुक परवाना अर्जांची जलद प्रक्रिया व्हावी व सुलभ व्हावी यासाठी एलआरओकडून एक ट्वीट करण्यात आले आहे.

या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री व खासदार मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे व भाजप आमदार नितेश राणे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या गलथान कारभारामुळे हिंदू दलित समाजघटकांची व त्यातही मातंग समाजाची सुरक्षा करण्यात पुणे पोलिसांना अपयश आल्याचा आरोप या ट्वीटमध्ये करण्यात आला आहे. तसेच यामुळेच हिंदू दलित समाजातील तब्बल 25 महिलांनी पुणे पोलिसांकडे शस्त्र परवाना मागितल्याचा दावा एलआरओने केला आहे.

जिहादी गुंडांच्या हल्ल्यामुळे हिंदू दलित नागरिकांना घरे सोडावी लागत आहेत. त्यांना घरे सोडायला भाग पाडले जात आहे. गेल्या काही दिवसांतच तीन प्राणघात हल्ले दलित हिंदूंवर केले गेले आहेत. मात्र या सर्व हल्ल्यांमधील गुन्हेगारांना शासन करण्यात पुणे पोलिसांना अपयश आल्याचा आरोप एलआरओने केला आहे. आगामी काळात 5000 नागरिक स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना मागणार असल्याचेही या ट्वीटमध्ये सांगण्यात आले आहे.

बंदुकीचा परवाना अर्ज फेटाळल्यास हिंदूंना खाजगी शस्त्रास्त्रांसह स्वतःहून सुरक्षिततेचे उपाय करणे भाग पडेल; अशावेळी त्यांच्यावर शस्त्रास्त्र कायदा लागू करता येणार नाही असेही एलआरओने नमूद केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने बंदूनक परवाना अर्जांची प्रक्रिया जलद व सुलभ करावी अशी मागणी एलआरओने केली आहे. तसेच यापुढे लोहियानगरमध्ये अशा प्रकारच्या जिहादी हल्ल्यांची एकही घटना घडल्यास व त्याला हिंदूंकडून प्रत्त्युत्तर मिळाल्यास त्यास सर्वस्वी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार कारणीभूत असतील अशी पूर्वसूचना एलआरओने दिली आहे.

https://x.com/LegalLro/status/1810174003861962962

एलआरओ विषयी –

लीगल राईटस् ऑब्झर्वेटरी ही एक राष्ट्रीय विचारांचा पुरस्कार करणारी संस्था आहे. राष्ट्रीय विचारांच्या संघर्षात कायदेशीर लढाई लढण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. यापूर्वी अनेकवेळा राष्ट्रविरोधी कारवायांविरोधात या संस्थेने न्यायालयात खटले दाखल केले आहेत. जिथे जिथे राष्ट्रीय सुरक्षेला बाधा पोहोचवली जाते तिथे तिथे संस्थेने हस्तक्षेप करत न्यायालयात धाव घेतली आहे. संस्थेचे काम मुख्यतः ईशान्य भारतातील घडामोडींशी संबंधित आहे. मात्र मुंबई व दिल्लीमध्येही संस्था कार्यरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *