विसाव्या आसियान-भारत शिखर संमेलनाच्या आरंभी पंतप्रधानांनी केलेले भाषण
एकविसावे शतक हे आशियाचे शतक आहे.आपल्या सर्वांचे शतक आहे. म्हणून कोविडपश्चातचे विश्व एका नियमाधिष्ठीत धारणेतून निर्माण होणे आवश्यक आहे तसेच मानवकल्याणासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरू असलेल्या विसाव्या आसियान-भारत शिखर संमेलनाच्या आरंभी पंतप्रधानांनी भाषण केले त्यावेळी ते बोलत होते.
आपल्या मैत्रीपूर्ण भागिदारीला आता चार दशके पूर्ण होत आहेत. अशा प्रसंगी भारत– आसियान शिखर संमेलनात सहअध्यक्षपद भूषविणे, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची पर्वणी आहे अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांना आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.
My remarks at the ASEAN-India Summit. https://t.co/OGpzOIKjIf
— Narendra Modi (@narendramodi) September 7, 2023
भारत आणि आसियान ऐतिहासिक तसेच भौगोलिक रूपानेही एकमेकांशी जोडलेले आहेत. त्याचबरोबर क्षेत्रीय एकता, शांति, समृद्धि, आणि विश्वाच्या बहुविध स्वरुपावरील असलेल्या आपल्या दोघांची असलेली श्रध्दा यामुळेही आपल्याला एकमेकांसोबत जोडले आहे. आसियान हा भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणाचा प्रमुख स्तंभ आहे. भारताच्या हिंद प्रशांत पुढाकारात ही आसीयान क्षेत्राला प्रमुख स्थान दिले आहे असे सांगत त्यांनी भारत आणि आसियान संबंधांचे महत्त्व विशद केले.
आजच्या या वैश्विक अनिश्चितततेच्या वातावरणात सुध्दा आपल्यातील सहयोग प्रत्येक क्षेत्रांत प्रगती साध्य करत आहे. हेच आपल्या मैत्रीचे सामर्थ्य आणि लवचिकतेचे द्योतक आहे. आसियानचे महत्व असे आहे, की इथे प्रत्येकाची गोष्ट ऐकून घेतली जाते, आणि वैश्विक विकासात आसियान क्षेत्राची महत्वपूर्ण भूमिका आहे म्हणून आसियान हा विकासाचा केंद्रबिंदू ठरला आहे असे मोदी यावेळी म्हणाले.
भारताच्या भूमिकेबाबत सांगताना पंतप्रधान पुढे म्हणाले, वसुधैव कुटुंबकम– एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भवितव्य ही भावनाच भारताच्या जी-20 अध्यक्षतेची संकल्पना आहे. मुक्त आणि खुल्याप्रकारच्या हिंद – प्रशांत प्रगतीसाठी; आणि ग्लोबल साउथ चा आवाज बुलंद करण्यातच आपल्या सर्वांचे हित निगडित आहे. आज आपल्या एकत्रित चर्चेतून भारत आणि आसियान क्षेत्राच्या भावी भविष्यासाठी आणि त्याला सुदृढ़ बनविण्यासाठी नवीन संकल्प केले जातील; यावर माझा विश्वास आहे.