शिवशंकर स्वामी यांच्या अथक प्रयत्नांना आले यश

संगमनेर (अहिल्यानगर), दि. १६ फेब्रुवारी : संगमनेर शहरातील बेकायदेशीर कत्तलखाने तात्काळ उध्वस्त करण्यात यावेत यासाठी अनेक दिवसांपासून गोसेवक प्रशासनाचा पाठपुरावा करत होते. त्यासाठी २८ जानेवारीपासून मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी सातत्याने आणि ठामपणे पाठपुरावा केला. संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे समक्ष भेट घेऊन लेखी निवेदन सादर करण्यात आले.
निवेदन देऊनही काही कसायांकडून कायद्याची पायमल्ली करत गायींची कत्तल सुरूच असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पुन्हा ठोस पाठपुरावा करण्यात आला. अखेर आज (१६ फेब्रुवारी) प्रशासन व पोलीस यंत्रणेने संयुक्त कारवाई करत संगमनेर शहरातील तब्बल १४ बेकायदेशीर कत्तलखाने JCB च्या साहाय्याने उध्वस्त केले. या कारवाईदरम्यान १०० पोलिसांचा फौजफाटा सज्ज होता. या कारवाईसाठी जिल्हाधिकारी आशिया व पोलीस अधीक्षक घार्गे तसेच त्यांच्या सर्व सहकारी बांधवांचे गोसेवकांकडून आभार मानण्यात येत आहेत.
गोसेवक शिवशंकर स्वामी यांचा सोशल मिडियावरील व्हिडिओ –
https://www.facebook.com/reel/1445546793617373
संगमनेर शहरात पुन्हा बेकायदेशीर कत्तलखाने उभे राहू नयेत यासाठी आता संगमनेर नगरपरिषद व प्रशासनाने सातत्याने दक्ष राहणे आवश्यक आहे, असे शिवशंकर स्वामी यांनी नमूद केले. विश्वहिंदू परिषद बजरंग दलाचे सचिन कानकाटे व सहकारी कार्यकर्त्यांनी यावेळी सहकार्य केले.

