Wednesday, September 6th, 2023

पुण्येश्वरासाठी पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलन

 

पुणे शहराचे नाव ज्यावरून पडले ते पुण्येश्वर मंदिर आणि या मंदिराच्या जागेवरील बेकायदा मस्जिद हटवण्यासाठी सकल हिंदू समाज बांधव आणि विविध संघटनांच्या वतीने पुणे महापालिका भवनासमोर नुकताच तीव्र आंदोलन करण्यात आले होते. भाजपाचे आमदार महेश लांडगे, नितेश राणे, पुणे भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, प्रखर हिंदूत्ववादी नेते डॉ. गजानन एकबोटे यांच्यासह मान्यवरांनी यावेळी पुण्येश्वराच्या मुक्तीचा संकल्प घेतला.

‘आम्ही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांचे अनुयायी आहोत. आम्ही अयोध्येतील बाबरी मशीद पाडू शकतो. तर पुण्येश्वरला अतिक्रमणातून मुक्त करण्यासाठी तिथे उभारलेली अनधिकृत मशीद पाडूच शकतो, अशी भीमगर्जना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *