भारतीय भू-भागावर दावा सांगणारा चीननं प्रकाशित केलेला नकाशा भारतानं फेटाळला

भारताच्या हद्दीवर दावा सांगणारा नकाशा चीननं प्रसिद्ध केला आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी चीनचा हा दावा फेटाळून लावला आहे. असे दावे केल्यानं कुठलाही भुभाग एखाद्या देशाचा होत नसल्याचं त्यांनी सांगितलं. चीनला असे नकाशे प्रसिद्ध करण्याची सवय आहे. चीननं नकाशात दाखवलेला भारताचा भुभाग हा भारताचाच असल्याचं त्यांनी खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी काय करायला हवं याची सरकारला पूर्ण जाणीव आहे.

यासंदर्भात चीनकडे निषेध नोंदवल्याचं जयशंकर म्हणाले. चीनच्या अशाप्रकारच्या कृत्यांमुळं सीमा प्रश्न सोडवणं आणखी जटील होतं अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी काल दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *