महाराष्ट्र राज्य
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जिंकले जग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जी -२० शिखर परिषदेतील सहभाग अभिमानास्पद, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली भावना मुंबई, दि. १० : जी – २० शिखर परिषदेच्या निमित्ताने जगभरातील देशांचे प्रमुख, राष्ट्राध्यक्ष भारतात एकाचवेळी एकाच व्यासपीठावर आले. यातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जग जिंकले अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. नवी दिल्ली येथे झालेल्या या ऐतिहासिक शिखर परिषदेत सहभागी होता आले
मोदी साहेब, जर आम्ही चुकीचे काम केले असेल तर खटला भरा – शरद पवार
देशाचे प्रधानमंत्री भोपाळला गेले आणि भोपाळला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. त्यांनी सांगितलं की, सर्व भ्रष्ट लोकं आहेत. अनेकांची माहिती आमच्याकडे आहे. माझं मोदी साहेबांना नम्रतेने सांगणे एकच आहे, जर या ठिकाणी कुणी चुकीचं काम केलं असेल तर त्याविरुद्ध तुम्ही खटला भरा, त्याची चौकशी करा आणि जर खोटं ठरलं तर त्याची सजा तुम्ही स्वतः काय
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ
तीन लाख शेतकऱ्यांना ३०० कोटी रुपये अनुदान वितरित होणार मुंबई : राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी ३५० रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या अनुदान वितरणाच्या पहिल्या टप्याचा शुभारंभ आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर
शेतकऱ्यांना फायदा व्हावा अशा दृष्टीने जलसंधारणाच्या कामांचे नियोजन करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जलसंधारण, जलसंपदा विभागांना निर्देश मुंबई : शेतकऱ्यांना फायदा व्हावा, अशा दृष्टीने जलसंधारण कामांचे नियोजन करावे. तसेच लहान-मोठे प्रकल्प, धरणांतील गाळ काढण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. कोकणातील जलसंधारणाच्या कामांचे निकष व मापदंड बदलण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील मृद व जलसंधारण विभागाच्या धोरणात्मक व लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने
ठाणे जिल्ह्यातील विकास कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करावीत – पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश
पालकमंत्र्यांनी जिल्हा वार्षिक नियोजन बैठकीत घेतला विविध यंत्रणांचा आढावा ठाणे : जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक योजनेत सन 2023-24 वर्षासाठी जिल्ह्याला वाढीव निधी मिळाला आहे. हा निधी 100 टक्के खर्च होणे अपेक्षित आहे, त्यासाठी ऑक्टोबर महिन्यापर्यंत सर्व विहीत कार्यवाही पूर्ण करुन कामांना सुरुवात करावी, कोणत्याही परिस्थितीत ही कामे डिसेंबर पर्यंत पूर्ण व्हायला हवीत, मात्र ही कामे