महाराष्ट्र राज्य
अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त अक्षता वितरण आणि निमंत्रण अभियान
पुणे महानगर समिती १ ते १५ जानेवारी दरम्यान ११ लाख घरी संपर्क करणार पुणे दि.२८ – अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी होते आहे. त्यानिमित्त श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्यातर्फे पुणे महानगर समितीच्यावतीने घरोघरी जाऊन श्री रामलला प्रतिष्ठापना सोहळ्याच्या अक्षता वितरण व निमंत्रण अभियान राबविण्यात येणार आहे. १ ते १५ जानेवारी २०२४
माधवराव पेशवे यांचे चरित्र उत्तम राज्यकर्त्याचे : सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे
‘स्वामी’ कादंबरीला साठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अध्यक्षस्थानावरून प्रतिपादन पुणे, १० डिसेंबर : राज्यकारभारासोबतच कोणत्या जीवन मूल्यांच्या प्रतिष्ठापनेसाठी राज्यकर्त्याने प्रयत्न केले यावरून त्या राज्यकर्त्याचे मूल्यमापन होते. माधवराव पेशवे यांचे चरित्र या निकषांवर उठून दिसते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी रविवारी केले. देसाई यांचे कुटुंबीय आणि मेहता पब्लिशिंग हाऊस यांच्या वतीने आयोजित स्व.
आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकार कटिबद्ध – राज्यपाल रमेश बैस
विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त देशभरात आज आरोग्य शिबिराचे आयोजन महाराष्ट्रात पाच जिल्ह्यात ३६ ठिकाणी आयोजित आरोग्य शिबिरांचा नागरिकांनी घेतला लाभ मुंबई, २१ नोव्हेंबर २०२३ : आदिवासी बांधवांना शिक्षित, कौशल्ययुक्त आणि सशक्त करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे योजना राबवित आहे. आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती करून स्वच्छता, अत्यावश्यक आर्थिक सेवा, वीज जोडणी, एलपीजी सिलिंडर, गरिबांसाठी घरे, अन्न
स्वच्छता अभियान केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी – मुख्यमंत्री
राज्यात ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा’ आणि ‘मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा’ मुंबई, दि. २६: स्वच्छता अभियान ही ‘लोकचळवळ’ झाली पाहिजे, हे अभियान केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. गांधी जयंतीच्या आदल्या दिवशी १ ऑक्टोबर रोजी प्रत्येकाने आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यावा या राज्य सरकारच्या उपक्रमाचा
सहकार चळवळीला व्यापक स्वरुप लक्ष्मणराव इनामदारांनी दिले –मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्र आणि गुजरातमधील समान धागा म्हणजे सहकार चळवळ होय. त्यामुळे लक्ष्मणराव इनामदार हे या दोन्ही राज्यातील संवादाचा सेतू होते. त्यांनी सहकार चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुंबई विद्यापीठ आणि सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी विद्यापीठाच्या फोर्ट येथील कावसजी जहागीर दीक्षांत सभागृहात लक्ष्मणराव इनामदार यांच्या स्मृतीनिमित्त
सहकारातूनच सर्वसामान्यांचा विकास शक्य – राज्यपाल रमेश बैस
लक्ष्मणराव इनामदार सहकार क्षेत्राचे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक होते. समाजात आमुलाग्र बदल घडविण्यासाठी आवश्यक बदल सहकार क्षेत्राच्या माध्यमातून घडू शकतील, असा त्यांचा विश्वास होता असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले आहे. मुंबई विद्यापीठ आणि सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी विद्यापीठाच्या फोर्ट येथील कावसजी जहागीर दीक्षांत सभागृहात लक्ष्मणराव इनामदार यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत
सहकार चळवळीचे भविष्य उज्ज्वल : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह
मुंबई, दि. २३: सहकार चळवळीने कालानुरुप स्वत:ला बदलणे आवश्यक आहे. देशात रोजगारनिर्मिती सोबतच आर्थिक विकास वाढविण्याची ताकद सहकार क्षेत्रात आहे. केंद्र सरकारही सहकार विद्यापीठाची स्थापना करुन त्या माध्यमातून बॅंक, दुग्धव्यवसाय, कृषी, विपणन क्षेत्रासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणार आहे. ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे बळकटीकरण करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे सहकार चळवळ
भारतातील पहिल्या दीपगृह महोत्सवाचे गोव्यात आयोजन
गोव्यामध्ये आजपासून भारतातील पहिल्या दीपगृह महोत्सवाचे आयोजन केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत अगुआडा किल्ला दीपगृह येथे या ऐतिहासिक महोत्सवाचे उद्घाटन करणार केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल उद्या गोव्यामध्ये पणजी येथील अगुआडा किल्ला दीपगृह येथे भारताच्या पहिल्या दीपगृह महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान
नारीशक्ती विधेयक राज्यसभेत मंजूर होणे हा महिलांसाठी गौरवाचा क्षण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि.२१- महिलांना आरक्षण देणारे नारीशक्ती विधेयक सर्वसंमतीने राज्यसभेत मंजूर झाले. हा क्षण महिलांसाठी गौरवाचा क्षण असून देशाच्या इतिहासात सुवर्णक्षराने लिहीला जाणार आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विधेयकाचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज महिला विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवत आहे. या कायद्यामुळे त्यांना राजकीय क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय आता व्हॉट्सॲप चॅनलवर!
मुंबई, दि. २० : ‘जनसामान्यांचे मुख्यमंत्री’, अशी ओळख असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील जनतेशी आता थेट व्हॉट्सॲपद्वारे ‘कनेक्ट’ झाले आहेत. काल गणेश चतुर्थीच्या दिवशी मुख्यमंत्री सचिवालयाच्या ‘सीएमओ महाराष्ट्र’ या व्हॉट्सॲप चॅनेलचा श्री गणेशा करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय, मंत्रिमंडळाचे निर्णय, शासनाच्या योजना, विविध विकास प्रकल्प आदींची अचूक आणि अधिकृत माहिती या चॅनेलच्या माध्यमातून आता