बातम्या
समाजपरिवर्तनाचे वैयक्तिक यशस्वी प्रयोग समाजव्यापी व्हावेत : अतुल लिमये
जनकल्याण समितीतर्फे दादा लाड आणि महंत भारतभूषणदासजी महाराज यांना ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान पुणे, दि. १४ फेब्रुवारी : “समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात परिवर्तनाचे अनेक यशस्वी प्रयोग वैयक्तिक पातळीवर सुरू आहेत. मात्र, हे प्रयोग केवळ व्यक्तीपुरते मर्यादित न राहता समाजव्यापी होण्याची गरज आहे. शासनावर अवलंबून न राहता काम उभे करणे ही काळाची गरज आहे. तसे झाल्यास अशा प्रयोगांतूनच
लव जिहाद विरोधात कडक कायदा करा, पुण्यातील मुलींची सरकारला कळकळीची विनंती
लव्ह जिहाद / धर्मांतरण विरोधी कायदा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे, दि. १३ फेब्रुवारी : सध्या अनेक राज्यांनी इस्लाम धर्माची बदलती लोकसंख्या लक्षात घेऊन वेळीच यावर उपाय करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश व गुजराथ राज्यांनी धर्मांतरण विरोधी कायदे लागू केले आहेत. यात फसवून धर्मांतरण करणे, लग्नाचे आमिष दाखवून, धमकावून किंवा चुकीची माहिती देऊन
गुणवत्तावान समाजातूनच राष्ट्र बलशाली बनते : डॉ. मोहन भागवत
जऊळके येथे शिक्षण संस्थाचालकांशी संवाद; संवेदनशील माणूस घडविणे हेच शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट जऊळके (ता. दिंडोरी), १० फेब्रुवारी : “संवेदनशील माणूस घडविण्याच्या प्रक्रियेत शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शिक्षणातूनच गुणवत्तावान समाज निर्माण होतो आणि असा प्रगल्भ समाजच राष्ट्राला बलशाली बनवतो. त्यामुळे शिक्षकांनी केवळ उपजीविका म्हणून नव्हे, तर आत्मीयतेने या पवित्र कार्यात झोकून दिले पाहिजे,” असे प्रतिपादन
धर्माच्या आचरणातूनच मानवजातीचे कल्याण : डॉ. मोहन भागवत
चांदवड तालुक्यातील णमोकार येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा सोहळा विविधतेत एकता हेच भारताचे बलस्थान मळसाणे (जि. नाशिक), दि. १० : “धर्माचा मार्ग सोडून भौतिकतेचा स्वीकार केलेल्या जगाला सुविधा मिळाल्या, मात्र सुख दुरावले आहे. यामुळेच आज मानवासमोर अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्राचीन ज्ञान यांचा समन्वय साधून धर्माच्या आचरणातूनच मानवजातीचे खरे कल्याण होईल,” असे प्रतिपादन
पुणेकरांसाठी सुवार्ता; पुरंदर विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता !
खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानत निर्णयाचे केले स्वागत मुंबई, दि. १० फेब्रुवारी : पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाने मान्यता दिल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली असून या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण प्रक्रिया १ जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. पुणे आणि
इंदापूरमध्ये नव्या औद्योगिक पर्वाची सुरुवात; अजित पवार यांचे स्वप्न साकार
रत्नपुरी माळ्यातील एक हजार एकर जमीन ‘एमआयडीसी’कडे हस्तांतरीत करण्याचा मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय मुंबई, दि. १० फेब्रुवारी : इंदापूर तालुक्यातील औद्योगिक विकासाला आज नवी दिशा मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या रत्नपुरी मळ्यातील तब्बल एक हजार एकर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून, त्यामुळे इंदापूरमध्ये नवीन औद्योगिक वसाहतीचा मार्ग
पुरंदर विमानतळ प्रकल्पाला मिळणार गती, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई, दि. १० फेब्रुवारी : पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. प्रकल्पाला गती देण्यासाठी, भुसंपादन व अनुषांगिक बाबींसाठी सहा हजार कोटींचे कर्ज देखील मंजूर करण्यात आले आहे. एमआयडीसी, एमएडीसी आणि सिडको यांची सहभागीदारी, त्यांच्याकडे भागीदारीनुसार कर्ज फेडीची जबाबदारी असणार आहे. या कर्जाला शासन मान्यता व हमी देण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत
सुनेत्रा पवारांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार, अजितदादांच्या आठवणीत कुटुंबीय भावुक
मुंबई, दि. १० फेब्रुवारी : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पदभार मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील आपल्या दालनात स्वीकारला. यावेळी त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली. राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ विभागांचा पदभारही त्यांनी स्वीकारला. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन
राज्यात लवकरच 70 हजार पदांची मेगा नोकरभरती; कौशल्याधारित व पारदर्शक डिजिटल भरती
मुंबई, दि. ९ फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सामान्य प्रशासन विभागाच्या सुधारणेसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत राज्यात लवकरच होणाऱ्या नोकरभरतीची प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरुपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश दिले. राज्यात जवळपास 70,000 हून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार असून, यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा
राज्यातील प्रशासकीय सुधारणांचा लाभ थेट सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावा : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. ९ फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय सुधारणांबाबत (गव्हर्नन्स प्रोसेस री-इंजीनियरिंग 2.0) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुख्यमंत्री फडणवीस या बैठकीत म्हणाले की, महाराष्ट्राच्या या अभिनव उपक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष कौतुक करत देशातील इतर राज्यांनाही याच धर्तीवर कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘जीपीआर 2.0’च्या माध्यमातून प्रशासकीय

