बातम्या
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी जपानी तंत्रज्ञानाचे सहाय्य
जपानी तंत्रज्ञानाच्या मदतीने फुलणार राज्यातील शेती जपानी एम २ लॅबो संस्थेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मुंबई, दि. ७: जपानचे तंत्रज्ञान शेतीच्या क्षेत्रात आणून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित १ अब्ज लोकांना मदत करायची आहे. मातीचे पुनरुज्जीवन, मॉडेल फार्म तयार करणे, ग्रीन हाऊस तंत्रज्ञान यावर महाराष्ट्र शासन जपानी एम २ लॅबो संस्थेसोबत काम करणार
कुतूहल आणि शैक्षणिक प्रशिक्षण यांचा संगम हा नाविन्याच्या शोधासाठी महत्त्वपूर्ण ठरतो – डॉ. अविनाश कुलकर्णी
डिपेक्स २०२५ : नाविन्यपूर्ण संकल्पनांचे भव्य प्रदर्शन पुणे, दि. ६ एप्रिल : कुतूहल आणि शैक्षणिक प्रशिक्षण यांचा संगम हा नाविन्याच्या शोधासाठी महत्त्वपूर्ण ठरतो. डॉ. कुलकर्णी यांनी नमूद केले की तंत्रज्ञान आणि उद्योग निर्माण करण्याची ही सुवर्णवेळ आहे असे मत डॉ. अविनाश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सृजन ट्रस्ट, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता
पौराणिक काळात हनुमान आणि आधुनिक काळात शिवाजी महाराज हे आपले आदर्श : सरसंघचालक
नागपूर, २ एप्रिल : छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारतवर्षात शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत आहेत. शिवचरित्राच्या अध्ययनाने आपले त्यांच्याशी ऋणानुबंध जोडले जातात. शिवचरित्र सतत संघर्षाची प्रेरणा देते. म्हणूनच त्यांना युगंधर, युगप्रवर्तक आणि युगपुरूष म्हटले जाते. एक व्यक्ती आणि राजाच्या रुपातील त्यांचे चरित्र म्हणूनच अनुकरणीय आहे अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा
भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्राला दिशा देणारे 34 वे Dipex यंदा पुण्यनगरीत आयोजित होणार
पुणे, दि. २८ मार्च : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सुजन व कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजfत डिपेक्स 25, दिनांक 3 ते 6 एप्रिल 2025 रोजी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीच्या मैदानावर संपन्न होणार आहे. डिपेक्स
वढू व तुळापूर बलिदान स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात येणार : एकनाथ शिंदे
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वढू येथे समाधी पूजन पुणे, दि. २९ : छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य प्रेरणा देणारे असून पुढील अनेक पिढ्यांना स्फूर्ती आणि ऊर्जा देणाऱ्या त्यांच्या वढू येथील समाधी स्थळ व तुळापूर येथील बलिदान स्थळाला पर्यटन क्षेत्र नव्हे तर तीर्थक्षेत्राचाच दर्जा देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शताब्दीनिमित्त पंचपरिवर्तनासाठी संघ कटिबद्ध : नाना जाधव
शताब्दी पर्वात देशभरात एक कोटींहून अधिक संघ कार्यकर्ते होणार सहभागी देशभरात एकूण सव्वा लाखांहून अधिक शाखा मंडलांमधील संघ विस्तारात ६७ टक्क्यांची वाढ संघ स्वयंसेवक समाजसेवा, कामगार संघटना, शेतकऱ्यांसह समाजातील विविध घटक कार्यरत पुणे, दि. २४ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावर्षी विजयादशमीला शंभर वर्षे पूर्ण करत आहे. शताब्दी वर्षात संघ कार्याचा विस्तार व समाज परिवर्तन यावर
शताब्दी वर्षात संघाचा विस्तार, सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रीय पुनर्जागरणावर भर
बेंगळुरू, २३ मार्च : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावर्षी विजयादशमीच्या दिवशी १०० वर्षे पूर्ण करत आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात संघाच्या कार्याचा विस्तार करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी सांगितले. बंगळुरू येथे नुकत्याच पार पडलेल्या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या समारोपानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या १०० वर्षांत देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यात संघ
शांतता व संयम पाळत धार्मिक सण साजरे करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र हे ‘प्रगतिशील राज्य’ असून या ठिकाणी जातीभेदाला थारा नाही. नागपूर शहरामध्ये १७ मार्च रोजी राज्याची सामाजिक घडी विस्कटणारी घटना घडली. या घटनेमुळे राज्याच्या शांततेला धक्का बसला. सध्या सर्वधर्मियांचे सण सुरू आहेत. नागरिकांनी संयम बाळगून शांतता राखत हे सण साजरे करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत नागपूर घटनेवर आधारित
औरंगजेबाची कबर ताबडतोब हटवावी; विहिंप आणि बजरंग दलाची मागणी
पुणे, दि. १५ मार्च : शिवछत्रपींच्या हिंदवी स्वराज्याचा शत्रू, छत्रपती शंभू महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्र शासनाने तातडीने हटवावी अशी मागणी आज विश्व हिंदू परिषद व बजरंग दलामार्फत करण्यात आली. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे आज पुण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली. परिषदेचे प्रांत मंत्री किशोर चव्हाण, बजरंग दलाचे प्रांत संयोजक नितीन महाजन यांच्यासह
समृद्ध समाज घडवण्यासाठी सर्वांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे चरित्र अभ्यासावे : प्रा. डॉ. श्यामाताई घोणसे
कराड (सातारा), दि. ११ मार्च : “छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या वैचारिक आदर्शानुसार आपले कार्य उभे करणाऱ्या कर्तृत्ववान महिला म्हणजे राजमाता अहिल्यादेवी होळकर ! संघर्षाच्या त्या काळात आपल्या कर्तृत्वाने अहिल्यादेवी लोकमाता झाल्या. त्यांचे विचार आणि जीवन चरित्र हे आजचा बलशाली समाज उभा करण्यासाठी प्रेरणादायी आहे. म्हणुनच समृद्ध समाज घडविण्यासाठी सर्वांनी अहिल्यादेवींचे चरित्र अभ्यासावे” असे प्रतिपादन संत

