बातम्या
शताब्दीनिमित्त पंचपरिवर्तनासाठी संघ कटिबद्ध : नाना जाधव
शताब्दी पर्वात देशभरात एक कोटींहून अधिक संघ कार्यकर्ते होणार सहभागी देशभरात एकूण सव्वा लाखांहून अधिक शाखा मंडलांमधील संघ विस्तारात ६७ टक्क्यांची वाढ संघ स्वयंसेवक समाजसेवा, कामगार संघटना, शेतकऱ्यांसह समाजातील विविध घटक कार्यरत पुणे, दि. २४ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावर्षी विजयादशमीला शंभर वर्षे पूर्ण करत आहे. शताब्दी वर्षात संघ कार्याचा विस्तार व समाज परिवर्तन यावर
शताब्दी वर्षात संघाचा विस्तार, सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रीय पुनर्जागरणावर भर
बेंगळुरू, २३ मार्च : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावर्षी विजयादशमीच्या दिवशी १०० वर्षे पूर्ण करत आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात संघाच्या कार्याचा विस्तार करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी सांगितले. बंगळुरू येथे नुकत्याच पार पडलेल्या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या समारोपानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या १०० वर्षांत देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यात संघ
शांतता व संयम पाळत धार्मिक सण साजरे करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र हे ‘प्रगतिशील राज्य’ असून या ठिकाणी जातीभेदाला थारा नाही. नागपूर शहरामध्ये १७ मार्च रोजी राज्याची सामाजिक घडी विस्कटणारी घटना घडली. या घटनेमुळे राज्याच्या शांततेला धक्का बसला. सध्या सर्वधर्मियांचे सण सुरू आहेत. नागरिकांनी संयम बाळगून शांतता राखत हे सण साजरे करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत नागपूर घटनेवर आधारित
औरंगजेबाची कबर ताबडतोब हटवावी; विहिंप आणि बजरंग दलाची मागणी
पुणे, दि. १५ मार्च : शिवछत्रपींच्या हिंदवी स्वराज्याचा शत्रू, छत्रपती शंभू महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्र शासनाने तातडीने हटवावी अशी मागणी आज विश्व हिंदू परिषद व बजरंग दलामार्फत करण्यात आली. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे आज पुण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली. परिषदेचे प्रांत मंत्री किशोर चव्हाण, बजरंग दलाचे प्रांत संयोजक नितीन महाजन यांच्यासह
समृद्ध समाज घडवण्यासाठी सर्वांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे चरित्र अभ्यासावे : प्रा. डॉ. श्यामाताई घोणसे
कराड (सातारा), दि. ११ मार्च : “छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या वैचारिक आदर्शानुसार आपले कार्य उभे करणाऱ्या कर्तृत्ववान महिला म्हणजे राजमाता अहिल्यादेवी होळकर ! संघर्षाच्या त्या काळात आपल्या कर्तृत्वाने अहिल्यादेवी लोकमाता झाल्या. त्यांचे विचार आणि जीवन चरित्र हे आजचा बलशाली समाज उभा करण्यासाठी प्रेरणादायी आहे. म्हणुनच समृद्ध समाज घडविण्यासाठी सर्वांनी अहिल्यादेवींचे चरित्र अभ्यासावे” असे प्रतिपादन संत
आंबेडकर, सावरकर व अण्णा भाऊ साठे हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे नेते : पद्मश्री दादा इदाते
निगडी (पुणे), दि. १० मार्च : “स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अण्णा भाऊ साठे हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे नेते होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर भारतीय स्वातंत्र्य चळवळीसाठी इंग्लंडमधून भारतात पिस्तुल पाठवल्या प्रकरणी त्यांना इंग्लंड मधून अटक करुन भारतात समुद्रामार्गे आणत असताना सावरकरांनी फ्रान्सजवळ बोटीतून समुद्रात उडी मारुन फ्रान्सच्या हद्दीत जाण्याचा प्रयत्न केला. पण ब्रिटीश पोलिसांनी त्यांना पकडले.
रा.स्व.संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा 21 मार्चपासून बेंगळुरू येथे होणार
दिल्ली, दि. ५ मार्च : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा यावर्षी 21, 22 आणि 23 मार्च 2025 रोजी बेंगळुरू येथे होत आहे. संघाच्या कामकाजातील ही सर्वोच्च निर्णय घेणारी बैठक दरवर्षी आयोजित केली जाते. बेंगळुरूमधील चन्नेनहळ्ळी येथील जनसेवा विद्या केंद्र परिसरात ही बैठक होणार आहे. बैठकीत 2024-25 चे इतिवृत्त ठेवण्यात येणार असून त्यावर विवेचनात्मक
बलात्काराच्या गुन्ह्यांना फाशीचीच शिक्षा हवी
भारतीय स्त्री शक्ती जागरण संस्थेची मागणी; मुख्यमंत्र्यांना ९ मागण्यांचे निवेदन पुणे, दिनांक १ मार्च : स्वारगेट बस स्थानकावरील बलात्काराची घटना अत्यंत संतापजनक असून, बलात्काराच्या गुन्ह्यांना फाशीचीच शिक्षा हवी, अशी मागणी भारतीय स्त्री शक्ती जागरण संस्थेच्या माध्यमातून पुणे शहरातील महिलांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. यासंबंधी नुकताच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मातृशक्तीने आपला निषेध आणि आक्रोश तीव्र शब्दांत व्यक्त
समाजासाठीचे प्रत्येक काम समाजानेच करणे आवश्यक : डॉ. कृष्णगोपालजी
पुणे, दि. १ मार्च : सर्व काही सरकार करेल ही पाश्चात्य आणि चुकीची धारणा आहे. सुरक्षा, न्याय अशा काही व्यवस्था आणि छोटी, मोठी कामे सरकार निश्चितपणे करेल. परंतु, समाजासाठी आवश्यक प्रत्येक काम करणे हे समाजाचेच दायित्व आहे. हा विश्वास समाजात पुनर्स्थापित करूया. यासाठीच ‘जनकल्याण समिती’सारख्या संस्थांचे कार्य अधिक गतीने पुढे जाणे आवश्यक आहे. त्यातूनच समाज
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
कुंभमेळा नियोजनात डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या सूचना मुंबई, दि. 26 : नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे सन 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वेगळे कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा बैठकीत दिल्या. तसेच हा सिंहस्थ कुंभ ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणून ओळखला जावा, यासाठीचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.