बातम्या
अस्पृश्यता ही विकृतीच; ही विकृती दूर करण्यासाठी समाज एकत्रित येण्याची गरज – भैय्याजी जोशी
नागपूर,ता.३. : अस्पृश्यता ही सर्वात मोठी विकृती आहे. ही विकृती दूर करण्यासाठी सर्व समाज एकत्रित होण्याची गरज आहे. सर्व समाज एक झाला तर समाज शक्तिशाली होईल, समाज शक्तिशाली झाला तर राष्ट्र शक्तिशाली होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले. विश्व हिंदू परिषद, सामाजिक समरसता अभियान तर्फे देवजी रावत लिखित ‘अस्पृश्यता
आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून पाकिस्तान आणि श्रीलंकेत
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने होणारी ही स्पर्धा १७ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतान इथं पहिला सामना सुरू झाला. यात नाणेफेक जिंकून पाकिस्ताननं फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताचा पहिला सामना शनिवारी पाकिस्तानशी श्रीलंकेतील कँडी इथं होणार आहे. पहिल्या गटात पाकिस्तान, भारत आणि नेपाळ
देशभरात रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या सणाचा उत्साह
बहिण-भावाच्या अतूट प्रेमाची साक्ष जपणारा राखी पौर्णिमेचा सण आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण बहीण भावाच्या प्रेमाच्या नात्याचं प्रतीक असून बहीण, भावाच्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आणि भरभराटीसाठी प्रार्थना करते, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. रक्षाबंधनाचा सण बहिण-भावाचं प्रेम आणि विश्वासाचं द्योतक
भारतीय भू-भागावर दावा सांगणारा चीननं प्रकाशित केलेला नकाशा भारतानं फेटाळला
भारताच्या हद्दीवर दावा सांगणारा नकाशा चीननं प्रसिद्ध केला आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी चीनचा हा दावा फेटाळून लावला आहे. असे दावे केल्यानं कुठलाही भुभाग एखाद्या देशाचा होत नसल्याचं त्यांनी सांगितलं. चीनला असे नकाशे प्रसिद्ध करण्याची सवय आहे. चीननं नकाशात दाखवलेला भारताचा भुभाग हा भारताचाच असल्याचं त्यांनी खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.