बातम्या
पारदर्शी व गतिमान शासन प्रतिमा निर्मितीसाठी महसूल यंत्रणेने कार्य करावे-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
शासनाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाची अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी* पुणे महसूल विभागाच्या कार्याचा महसूल मंत्र्यांनी घेतला आढावा पुणे, दि.१० : महसूल खाते शासनाचा चेहरा म्हणून ओळखले जाते. लोकाभिमुख प्रशासनासाठी महसूल यंत्रणेतील जिल्हाधिकारी यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी आठवड्यातील किमान दोन दिवस आपल्या कार्यक्षेत्रात ग्रामीण भागापर्यंत दौरे करावे आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घ्यावा आणि ती
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, अधिसूचना महाराष्ट्राला सुपूर्त
मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती नवी दिल्ली, दि. ८ : मराठी भाषेला अभिजात भाषेचा मान मिळाल्याबाबतची अधिसूचना आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्त केली असल्याची माहिती सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, अभिजात
२२ जानेवारीपासून इंदापुरात सुरू होणार राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन
क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला इंदापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या तयारीचा आढावा पुणे, दि. ६ : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने २२ ते २६ जानेवारी २०२५ दरम्यान आयोजित राज्यस्तरीय कृषी-पशु प्रदर्शन, घोडे बाजार व डॉग शोच्या अनुषंगाने क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, विभागीय
पत्रकार दिनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या भविष्यवेधी संकल्पनेची निवड योग्य : राज्यपाल
‘महाराष्ट्राची पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स मीडिया हॅकेथॉन’चे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन पुणे, दि. ५ : पत्रकार संघटनेने या वर्षीच्या पत्रकार दिनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही नाविन्यपूर्ण आणि भविष्यवेधी संकल्पना निवडली आहे; आज ‘एआय’ ही माध्यमांसहित सर्व उद्योगांमध्ये एक परिवर्तनकारी शक्ती म्हणून उदयास आली असताना ही निवड योग्य वेळी आणि महत्त्वाची आहे, असे मत
सार्वजनिक आरोग्य सेवा अधिकाधिक दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करणार : आरोग्य मंत्री
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची औंध जिल्हा रुग्णालय आणि येरवडा मनोरुग्णालयाला भेट पुणे, दि. ३ : आरोग्य सेवा अधिकाधिक दर्जेदार होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून गरजू रुग्णांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणांनी नेहमी तत्पर रहावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. औंध जिल्हा रुग्णालय आणि
राष्ट्रीय सुरक्षिततेच्याबाबत भारतीय सैन्यदल सक्षम : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘नो युवर आर्मी’मेळाव्याचे उद्धाटन पुणे, दि. ३: भारत देश राष्ट्रीय सुरक्षिततेच्या अनुषंगाने अंतर्गत आणि बाह्यबाजूने मजबूत आहे; भारतीय सेना जगातील उत्तम सेनेपैकी एक असून भू, जल व वायू अशा कोणत्याही मार्गाने होणाऱ्या हल्ल्यास प्रतिकार करण्यास सैन्यदल सक्षम आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ‘समर्थ भारत सक्षम सेना’ या
समाजात बंधुता रुजवण्यासाठी एकदिलाने काम करुया !” – प्रदीप रावत
डॉ. आंबेडकरांनी भेट दिलेल्या संघस्थानावर बंधुता परिषदेचे आयोजन कराड, २ जानेवारी : “इतिहासाच्या सागरातून कोळसा उगळायचा की चंदन हे आपण ठरवायचं. खऱ्या अर्थाने आपल्या प्रत्येक कृती मधून बंधुता जोपासून आपण चंदनाचा सुगंध सर्वत्र पसरविण्यासाठी प्रयत्न करुया, आपली गावकी एक आहे पण भावकी सुद्धा एक झाली पाहिजे, असे प्रतिपादन बंधुता परिषदेचे अध्यक्ष माजी खासदार प्रदीपदादा रावत
दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागांच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक
नवी दिल्ली 2 : राज्यातील दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या पुढाकाराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष कौतुक केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समाजमाध्यमावरील पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पंतप्रधान मोदी म्हणाले, “महाराष्ट्र सरकारने दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे मी अभिनंदन करतो. हे प्रयत्न लोकांच्या जीवनात
समता, मानवता आणि बंधूभाव या मूल्यांचा जागर करणाऱ्या समता वारीचे उद्या मंगळवेढ्यातून प्रस्थान
पुणे : सामाजिक एकतेसाठी ‘संत विचारांची शिदोरी’ घेऊन निघणाऱ्या चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेचीचे प्रस्थान बुधवारी १ जानेवारीला मंगळवेढा येथून होणार आहे. संत चोखामेळा अध्यासन केंद्र आणि वृंदावन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चोखोबा ते तुकोबा’ या समता वारीचे आयोजन करण्यात आले आहे. वारीचा प्रारंभ बुधवार, दि. १ जानेवारी २०२५ रोजी श्री संत चोखामेळा महाराजांची
भारत विश्वगुरू होण्याचे स्वप्न येत्या २० वर्षात गाठू शकेल – डॉ. मोहन भागवत यांचा विश्वास
पुणे, ता. १९ : सर्व प्रकारची साधन संपत्ती उपलब्ध असूनही जगात शांती नाही, म्हणूनच जगाला आज गुरूची आवश्यकता भासते आहे. तो गुरू भारत होऊ शकतो ही जगाची अपेक्षा आहे. त्याची पूर्तता भारत करू शकतो. यासाठी भारतीयांना आपल्या गुणांचा किमान स्तर निर्माण करून तसे आचरण करावे लागेल. असे केल्यास विश्व गुरूचे स्थान आपण येत्या २० वर्षात

