Thursday, September 14th, 2023

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीला पुण्यात प्रारंभ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीला आज सकाळी ९ वाजता पुण्यात सुरूवात झाली. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पार्चन करून बैठकीस प्रारंभ झाला. बैठकीस ३६ संघटनांचे एकूण २६७ प्रमुख पदाधिकारी उपस्थित असून त्यातील ३० महिला आहेत. बैठकीस उपस्थित असलेल्यांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व सह सरकार्यवाह डॉ.

Read More

‘आयुष्मान भव:’ मोहिमेत महाराष्ट्र उत्कृष्ट काम करून दाखवेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आपल्याकडे निरोगी आयुष्यासाठी ‘आयुष्मान भव:’ असा आशीर्वाद दिला जातो. या भावनेतून देशवासीयांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आयुष्मान भव:’ मोहिमेची सुरूवात राज्यभर करणार आहोत. या मोहिमेत महाराष्ट्र देशामध्ये उत्कृष्ट काम करून नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. ‘आयुष्मान भव:’ मोहिमेचा राष्ट्रपती द्रौपदी

Read More

राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी केला ‘आयुष्मान भव’ मोहिमेचा प्रारंभ

आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आयुष्मान भव हा एक मोठा उपक्रम म्हणून उदयास येईल. : डॉ. मांडविया भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाची महत्त्वाकांक्षी मोहिम आयुष्मान भव आजपासून सुरू होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज ही मोहिम तसेच आयुष्मान भव पोर्टलचा शुभारंभ केला. गुजरातमधील गांधीनगर येथील राजभवन येथून दूरदृश्य प्रणालीमार्फत त्यांनी ही मोहिम सुरू केली. यावेळी राष्ट्रपतींसोबत केंद्रीय आरोग्य

Read More

संघाच्या समन्वय बैठकीत प्रमुख राष्ट्रीय मुद्दे आणि सामाजिक परिवर्तनासाठीचे प्रयत्न यावर होणार चर्चा – सुनील आंबेकर

सामाजिक आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्यांचा चर्चेत समावेश   पुणे, दि. १३ सप्टेंबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक २०२३ पुणे येथे होत असून या बैठकीत ३६ संघटनांचे २६६ प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पर्यावरणपूरक जीवनशैली, जीवनमूल्यांवर आधारित कुटुंबव्यवस्था, समरसतेचा आग्रह, स्वदेशी आचरण आणि नागरी कर्तव्यांचे पालन या पाच मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार असल्याची

Read More

स्वामीजींचा कालातीत संदेश म्हणजे मार्गदर्शन करणारा प्रकाशस्तंभच

स्वामी विवेकानंद यांनी 130 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी शिकागो येथे केलेल्या भाषणाचे पंतप्रधानांनी केले स्मरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की 130 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्म संसदेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी केलेले भाषण आजदेखील जागतिक एकात्मता आणि सौहार्द राखण्यासाठीचे आवाहन म्हणून ध्वनित होत आहे. एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले: “स्वामी विवेकानंद

Read More

G-20 राष्ट्रप्रमुखांनी राजघाटावर महात्मा गांधी यांना अर्पण केली आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि G-20 सदस्य राष्ट्रांच्या नेत्यांनी आज ऐतिहासिक राजघाटावर महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. गांधीजींचे कालातीत आदर्श सुसंवादी, समावेशक आणि समृद्ध जागतिक भवितव्यासाठी सामुदायिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. गांधीजींचे कालातीत आदर्श आमच्या सामुदायिक दृष्टीकोनातून सुसंवादी, समावेशक आणि समृद्ध जागतिक भवितव्यासाठी मार्गदर्शन करतात अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या

Read More

भारत मंडपम येथील नटराज पुतळा भारताची प्राचीन कलात्मकता आणि परंपरांची साक्ष देईल: पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारत मंडपम येथील भव्य नटराज पुतळा भारताचा समृद्ध इतिहास आणि संस्कृतीची साक्ष देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राने एक्सवर प्रसारित केलेली पोस्ट शेअर करून पंतप्रधानांनी म्हटले आहे: “भारत मंडपम येथील भव्य नटराज पुतळा भारताचा समृद्ध इतिहास आणि संस्कृतीची महती प्रदर्शित करतो. G20 परिषदेसाठी जगभरातले नेते इथे एकत्र येत

Read More

नवयुवकांना सैन्य दलात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे : मिलिंद वाईकर

अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पुणे महानगरतर्फे पुण्यात वीर नारी, वीर पत्नी व वीर मातांसाठी सामाजिक रक्षाबंधन पुणे : “वीर पत्नी,वीर मातांसाठी सामाजिक रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करून अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेने समाजभान ठेऊन एक आदर्श निर्माण केला आहे.सैनिक सीमेवर जीवावर उदार होऊन लढत असतो त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी असे उपक्रम घेतले पाहिजे,”असे प्रतिपादन

Read More

संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक १४ ते १६ सप्टेंबर दरम्यान पुण्यात

  पुणे – दि. 4 सप्टेंबर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दरवर्षी होणारी अखिल भारतीय समन्वय बैठक या वर्षी महाराष्ट्रातील पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे. तीन दिवसांची ही समन्वय बैठक 14-15-16 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. अखिल भारतीय पातळीवरची ही व्यापक समन्वय बैठक वर्षातून एकदा आयोजित होते. या बैठकीत पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, माननीय

Read More

भारतीय भू-भागावर दावा सांगणारा चीननं प्रकाशित केलेला नकाशा भारतानं फेटाळला

भारताच्या हद्दीवर दावा सांगणारा नकाशा चीननं प्रसिद्ध केला आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी चीनचा हा दावा फेटाळून लावला आहे. असे दावे केल्यानं कुठलाही भुभाग एखाद्या देशाचा होत नसल्याचं त्यांनी सांगितलं. चीनला असे नकाशे प्रसिद्ध करण्याची सवय आहे. चीननं नकाशात दाखवलेला भारताचा भुभाग हा भारताचाच असल्याचं त्यांनी खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

Read More