आंतरराष्ट्रीय
गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका
पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन पुणे, दि. 12 मार्च : पुणे जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा पुरवठा नियमितपणे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व एलपीजी वितरक तसेच तेल कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा
दुबईत अडकलेले 111 नागरिक पुण्यात सुखरूप पोहोचले, उर्वरित 73 नागरिकांसाठी शर्थीचे प्रयत्न
पुणे, दि. 4 मार्च : मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुबई येथे अडकलेल्या जिल्ह्यातील एकूण १८४ नागरिकांपैकी १११ नागरिक पुण्यात सुखरूप पोहोचले आहेत. तसेच १९ नागरिकांच्या विमान उड्डाणाची वेळ बदलण्यात आली असून ५४ नागरिकांना परत आणण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. भारत सरकार
भारत-इस्रायलमध्ये आता विशेष धोरणात्मक भागीदारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेतली नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी व्यापक चर्चा केली आणि भारत-इस्रायल संबंधांना विशेष धोरणात्मक भागीदारीमध्ये उन्नत करण्याची घोषणा केली. दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानात सहकार्य मजबूत करण्यास सहमती दर्शविली, ज्यामध्ये एक महत्त्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान भागीदारी
पंतप्रधानांनी घेतली इस्रायलच्या राष्ट्रपतींची भेट
तेल अवीव, दि. 26 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जेरुसलेममध्ये इस्रायलचे राष्ट्रपती इसाक हर्झोग यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी 2017 मधील आपला इस्रायल दौरा आणि 2023 मधील दुबई दौऱ्याच्या वेळी राष्ट्रपती हर्झोग यांच्यासोबत झालेल्या मागील भेटींच्या आठवणींना उजाळा दिला. भारत – इस्रायलमधील संबंध नव्या उंचीवर पोहोचले असून, ते आता शांतता, नवोन्मेष आणि समृद्धीसाठी
पंतप्रधानांनी जेरुसलेम येथील तंत्रज्ञान प्रदर्शनाला दिली भेट
जेरूसलेम (इस्रायल), 25 फेब्रुवारी : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासह विविध क्षेत्रांमधील अग्रगण्य इस्रायली नवोपक्रमांच्या प्रदर्शनाला आज इस्रायल दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. या प्रदर्शनात कृषी-तंत्रज्ञान, जल-तंत्रज्ञान, हवामान-तंत्रज्ञान, आरोग्य-बायोटेक, स्मार्ट मोबिलिटी, एआय, सायबरसुरक्षा आणि क्वांटम तंत्रज्ञानात विशेष कार्य करणाऱ्या आघाडीच्या कंपन्या आणि संशोधन संस्थांचा समावेश होता. नवोन्मेष आणि तंत्रज्ञान भागीदारी हा भारत-इस्रायल द्विपक्षीय
संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा यंदा हरियाणामध्ये
संघशताब्दी निमित्त आगामी वर्षभराच्या नियोजनावर होणार मंथन नवी दिल्ली, दि. 24 फेब्रुवारी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘अखिल भारतीय प्रतिनिधी सभे’चे आयोजन यावर्षी हरियाणातील समालखा येथे करण्यात आले आहे. 13, 14 आणि 15 मार्च 2026 रोजी पट्टीकल्याणा येथील ग्रामविकास आणि सेवा साधना केंद्रात ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर
जागतिक लॉजिस्टिक्समध्ये महाराष्ट्राची गरुड झेप!
मुंबई, 18 फेब्रुवारी : हा केवळ भूमिपूजन समारंभ नसून भारत, मुंबई आणि महाराष्ट्रातील लॉजिस्टिक्स क्षेत्रात नवे पर्व सुरू करणारा महत्त्वपूर्ण क्षण आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्स हबचे भूमिपूजन आज फडणवीस यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. जागतिक व्यापार क्षेत्रातील बदलती परिस्थिती आणि पुरवठा साखळीच्या पुनर्रचनेच्या
भारत-फ्रान्स भागीदारी जागतिक स्थैर्य आणि प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण : नरेंद्र मोदी
मुंबई, दि. 17 फेब्रुवारी : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मुंबई भेटीदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात लोकभवन येथे बैठक झाली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना दोन्ही नेत्यांनी या द्विपक्षीय सहकार्याला नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी भारतामध्ये एअरबस एच 125 हेलिकॉप्टरसाठी टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्सच्या असेंब्ली लाईनचे दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. यावेळी परराष्ट्र व्यवहार
‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट-2026’मध्ये महिला समृध्दीचा निर्धार
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला एआयची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य, विजया रहाटकर यांचा आशावाद नवी दिल्ली, दि. १६ फेब्रुवारी : आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे केवळ एक तांत्रिक साधन नसून शिक्षण, प्रशासन आणि उद्योग क्षेत्राचा केंद्रबिंदू ठरत आहे. आगामी काळात एआयमुळे रोजगाराच्या संधी आणि स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलणार असून महिलांनी या
भारताची वाढ ही योगायोग नसून संरचनात्मक परिवर्तनाचे फलित : देवेंद्र फडणवीस
बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू : भारत आणि महाराष्ट्र! मुंबई, दि. १७ फेब्रुवारी : जागतिक आर्थिक व्यवस्थेची नव्याने पुनर्रचना सुरू असताना भारताची वाढ ही योगायोग नसून संरचनात्मक परिवर्तनाचे फलित आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज मुंबई येथे ‘ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन 2026’ च्या उदघाटन

