कला, संस्कृती व इतिहास
छत्रपतीं शिवरायांमुळे देशात राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग : सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे
छत्रपती शिवाजी महाराजांवरील आठ पुस्तकांचे दिल्लीत प्रकाशन नवी दिल्ली : ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताच मनात राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग जागृत होते. गुलामगिरी कशी झुगारून द्यावी याचा आदर्श शिवाजी महाराज होते. त्यांचे जीवन केवळ भारतीयांसाठी नव्हे तर परदेशातीलही गुलामगिरीविरूद्धच्या लढ्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे’, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी व्यक्त केले. नवी दिल्ली येथे
अवघे गर्जे पंढरपूर | चालला नामाचा गजर
राज्यातील लाखो भाविकांच्या आगमनाने फुलली पंढरी पंढरपूर, 16 जुलै : आषाढी एकादशीच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील विविध भागांसह, गोवा, कर्नाटक व तेलंगणा राज्यातील लाखो भाविकांच्या आगमनाने पंढरी नगरी फुलून गेली आहे. यंदा आषाढी नवमीच्या दिवशी सुमारे ५ लाखाहून अधिक भाविक विठ्ठल नगरीमध्ये दाखल झाले असून आषाढी एकादशीच्या दिवशी तर विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान
बारामती, पुरंदर, शिरूरमधील बारवांची स्वच्छता, सेवावर्धीनीच्या स्वयंसेवकांचे श्रमदान
पुणे, दि. १० जुलै : बारामती तालुक्यातील सुपे येथील ऐतिहासिक राखुंडी विहीर आणि स्वयंभू श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरातील पायऱ्या असलेल्या विशिष्ट विहिरींची श्रमदानाने स्वच्छता केल्याने स्वच्छ पाण्याने विहिरी आणि परिसर खुलला आहे. पुण्यातील सेवावर्धिनी संस्थेच्या स्वयंसेवकांनी हा उपक्रम राबविला आहे. सेवावर्धीनीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारव पुनरुज्जीवन व पुनर्वापर प्रकल्पांतर्गत विहिरी स्वच्छतेचा उपक्रम राबवला जात
धर्मवीर गडावर वृक्षारोपण करुन दुर्गदिन साजरा
पुणे, दि. 8 जुलै : ज्येष्ठ कादंबरीकार व दुर्गमहर्षी गो. नी. दांडेकर यांनी ऐतिहासिक दुर्ग वैभवाचा परिचय महाराष्ट्राला करून दिला. म्हणून त्यांची पुण्यतिथी गडप्रेमीं कडून “दुर्गदिन” म्हणून साजरी केली जाते. या वर्षी गोनीदांच्या 25 व्या पुण्यतिथीला इतिहास प्रेमी मंडळ आणि श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीरगड (बहादुर गड) येथे 30 चिंचेच्या झाडांचे वृक्षारोपण
विठुनामाच्या गजरात ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्या पुण्यात दाखल
दोन दिवस पुणे भक्तिरसात न्हाऊन निघणार कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आज पुण्यनगरीत आगमन झाले. अखंड विठ्ठलनामाचा गजर करत लाखो वारकरी पायी चालत पालखीसोबत पुण्यात दाखल झाले. आज व उद्या दोन दिवस दोन्ही पालख्यांचे मुक्काम पुण्यात असणार आहेत. पुणेकरांना या दोन्ही संतांच्या सहवासाचे भाग्य लाभणार आहे. या
मंदिरे समाजाची संस्कार शिदोरी : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
सोलापूर, दि. २७ जून : बाराव्या शतकापासून सातत्याने चालणाऱ्या मंगलकारी परंपरेमध्ये मंदिरे ही समाजाची केंद्रे आहेत. या परंपरेच्या निर्वहनासाठी श्रद्धेची, संस्काराची शिदोरी पिढी दर पिढी सातत्याने मिळत आल्याने समाज उत्तमरित्या जगत आला आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. येथील श्री सिद्धेश्वर देवस्थानला भेट देऊन सरसंघचालक भागवत यांनी शिवयोग समाधीचे
आषाढी वारी निमित्त विविध मार्गांवर ‘जिज्ञासा’तर्फे आरोग्य सेवा शिबिरांचे आयोजन
पुणे, २७ जून: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचा मानबिंदू आहे. या वारीत येणाऱ्या वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा पुरवण्याचे काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जिज्ञासा आयामाचे विद्यार्थी मागील ९ वर्षांपासून करत आले आहेत. या वर्षीच्या वारीसाठी ठिकठिकाणाहून दिंडींने पंढरपूरसाठी प्रस्थान केले आहे. याही वर्षी जिज्ञासाचे विद्यार्थी वारीत सेवाकार्य करणार असल्याची माहिती अभाविपतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात
श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने प्रभावित झालो : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
अक्कलकोट, दि. २४ जून : श्री गुरु दत्तात्रयांचे अवतार सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पदस्पर्शाने अक्कलकोट भूमीसह संपूर्ण भारतातील अनेक प्रांत पावन झाले आहेत, त्यामुळे श्री स्वामी समर्थांच्या कार्याचा विस्तार संपूर्ण देशात आहे. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने प्रभावित झालो असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक
ज्ञानवापी मंदिरात ३१ वर्षांनी निनादले आरतीचे स्वर
कोर्टाच्या आदेशानंतर ज्ञानवापीच्या तळघरात मध्यरात्री झाली पूजा वाराणसी, १ फेब्रुवारी : वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर बुधवारी रात्री उशिरा ज्ञानवापी संकुलातील व्यासजींच्या तळघरात पूजा सुरू करण्यात आली. तसेच आज, गुरुवारी पहाटे मंगला आरतीही झाली. न्यायालयाने तब्बल 31 वर्षांनंतर हिंदूंना पूजा करण्यास परवानगी दिली आहे. व्यासजींच्या तळघरात सध्या सर्वसामान्य भाविकांना प्रवेश बंदी आहे. पूजेच्या वेळी फक्त पुजारी
ज्ञानवापीच्या तळघरात हिंदूंना पूजेची परवानगी
‘व्यास का तहखाना’ येथे होणार नित्य पूजा वाराणसी, ३१ जानेवारी : उत्तरप्रदेशच्या वाराणसी न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदूंना पूजेची परवानगी दिली आहे. त्यानुसार ज्ञानवापी परिसरातील ‘व्यास का तहखाना’ येथे हिंदूंना आरती-पूजा करता येणार आहे.वाराणसी कोर्टाने यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या असून येत्या ७ दिवसात यासंदर्भात आवश्यक व्यवस्था करुन देण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात हिंदू पक्षकारांचे