मराठी भाषेची ख्याती विश्वस्तरावर पोहोचवण्यासाठी विश्व मराठी संमेलनात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा : उदय सामंत

विश्व मराठी संमेलनाच्या नियोजनाचा मंत्री उदय सामंत यांनी घेतला आढावा पुणे, दि. २५: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर विश्व मराठी संमेलन पुणे येथे होत आहे. पुस्तक महोत्सवाप्रमाणेच मराठी भाषेची ख्याती विश्वस्तरावर पोहोचवण्यासाठी विश्व मराठी संमेलनात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. फर्ग्युसन महाविद्यालय येथे ३१

Read More

भारताला ‘विश्वगुरू’च्या दिशेने नेण्यासाठी विज्ञाननिष्ठ संस्कृतीची आवश्यकता : राहुल सोलापूरकर

कोथरूड मध्ये ३५ व्या ‘सांस्कृतिक व्याख्यानमालेला’ उत्तम प्रतिसाद पुणे दि. १० जानेवारी : भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाश्चिमात्य विचार सोडून आपली संस्कृती आणि परंपरा कशी विज्ञाननिष्ठ आहे हे लोकांना षड्-दर्शनाच्या दृष्टीकोनातून दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच, देशाला विश्वगुरूच्या दिशेने नेण्यासाठी विज्ञाननिष्ठ हिंदू संस्कृतीचीच आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जेष्ठ नाट्य आणि सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले.

Read More

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, अधिसूचना महाराष्ट्राला सुपूर्त

मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती नवी दिल्ली, दि. ८ : मराठी भाषेला अभिजात भाषेचा मान मिळाल्याबाबतची अधिसूचना आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्त केली असल्याची माहिती सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, अभिजात

Read More

समता, मानवता आणि बंधूभाव या मूल्यांचा जागर करणाऱ्या समता वारीचे उद्या मंगळवेढ्यातून प्रस्थान

पुणे : सामाजिक एकतेसाठी ‘संत विचारांची शिदोरी’ घेऊन निघणाऱ्या चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेचीचे प्रस्थान बुधवारी १ जानेवारीला मंगळवेढा येथून होणार आहे. संत चोखामेळा अध्यासन केंद्र आणि वृंदावन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चोखोबा ते तुकोबा’ या समता वारीचे आयोजन करण्यात आले आहे. वारीचा प्रारंभ बुधवार, दि. १ जानेवारी २०२५ रोजी श्री संत चोखामेळा महाराजांची

Read More

धर्माचे एकत्व व्यवहारातून प्रकट व्हावे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्याचा शुभारंभ चिंचवड, दिनांक १७ : व्यक्ती, समाज आणि निसर्ग यांचे जीवन परमेष्ठीकडे नेण्याचे कार्य धर्म करतो. समाजाच्या एकत्वाचा आधार असलेला हा धर्म व्यवहारातून प्रकट व्हायला हवा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन सोहळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमात ते

Read More

लोकमंथन 2024 – भाग्यनगर ठरणार एकतेचे दर्शन घडविणाऱ्या भारताच्या सर्वात मोठ्या सांस्कृतिक उत्सवाचा साक्षीदार

भाग्यनगर : भारतीय विचारवंत, कलाकार आणि विचारवंतांना एकत्र आणण्यासाठी ‘राष्ट्र प्रथम’चे विचारवंत आणि अभ्यासकांचा संवाद ठरणाऱ्या 21 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या लोकमंथन 2024 ची तयारी सुरू असल्यामुळे भाग्यनगरमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी आणि प्रज्ञा प्रवाहचे राष्ट्रीय संयोजक जे. नंदकुमार यांनी टूरिझम प्लाझा येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत या आगामी

Read More

आबासाहेब मुजुमदारांचे कार्य दीपस्तंभासारखे – प्रदीप रावत

पुणे : थोर इतिहास संशोधक व कला, साहित्य संगीत क्षेत्रात मोलाचे कार्य करणारे सरदार कै. गंगाधर नारायण उर्फ आबासाहेब मुजुमदार स्मृती पुरस्कार वितरण सोहळा भारत इतिहास संशोधक मंडळात २० सप्टेंबर २०२४ रोजी पार पडला. ज्येष्ठ विचारवंत व माजी खासदार प्रदीपदादा रावत यांच्या हस्ते इतिहास संशोधक महेश तेंडुलकर यांना आबासाहेब मुजुमदारांच्या नावाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Read More

धर्म हीच आपल्या राष्ट्राची जीवनशक्ती – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

तंजावरचे मराठे पुस्तकाचे प्रकाशन पुणे, दि. ९ सप्टेंबर : महाराष्ट्रातील मराठे तमिळनाडूत परके ठरले नाही. कारण स्थानिक समाजजीवनाला त्यांनी समृद्ध केले. आपल्यातील हा एकतेचा धागा धर्मातून येतो. सत्यातून येणारा हाच हिंदू धर्म भारतीय राष्ट्राची प्रेरणा आहे,तीच आपली जीवनशक्ती आहे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. कोथरूड येथील बालशिक्षण मंदिरात

Read More

खंडोबा हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे दैवत : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

जेजुरी देवस्थानाकडून मानपत्र प्रदान   पुणे : देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे दैवत म्हणजे खंडोबा. जेजूरी गडावर आल्यामुळे आज खऱ्या अर्थाने माझे देवदर्शन झाले आहे. समाज जागृतीचे हे श्रद्धा केंद्र असून, धर्म याच श्रद्धेमुळे टिकला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. सरसंघचालकांनी गुरूवारी (ता.५) जेजूरी येथील श्री मार्तंड देव संस्थानाला

Read More

कालसुसंगत वेदज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

सरसंघचालकांच्या हस्ते वेद सेवकांचा सन्मान पुणे : “परंपरेने वेदांचे रक्षण आपण करत आला आहात. आज समाजात श्रद्धा जागृत ठेवण्यासाठी कालसूसंगत वेदज्ञान सर्वसामान्यांपर्यंच पोहचवले पाहिजे”, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. शास्त्रांमध्ये अस्पृश्यतेला स्थान नसतानाही भेदाभेद अमंगळ कशासाठी, असा प्रश्नही सरसंघचालकांनी उपस्थित केला. बालगंधर्व रंगमंदिर येथे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास आणि

Read More