कला, संस्कृती व इतिहास
धर्माचे एकत्व व्यवहारातून प्रकट व्हावे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्याचा शुभारंभ चिंचवड, दिनांक १७ : व्यक्ती, समाज आणि निसर्ग यांचे जीवन परमेष्ठीकडे नेण्याचे कार्य धर्म करतो. समाजाच्या एकत्वाचा आधार असलेला हा धर्म व्यवहारातून प्रकट व्हायला हवा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन सोहळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमात ते
लोकमंथन 2024 – भाग्यनगर ठरणार एकतेचे दर्शन घडविणाऱ्या भारताच्या सर्वात मोठ्या सांस्कृतिक उत्सवाचा साक्षीदार
भाग्यनगर : भारतीय विचारवंत, कलाकार आणि विचारवंतांना एकत्र आणण्यासाठी ‘राष्ट्र प्रथम’चे विचारवंत आणि अभ्यासकांचा संवाद ठरणाऱ्या 21 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या लोकमंथन 2024 ची तयारी सुरू असल्यामुळे भाग्यनगरमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी आणि प्रज्ञा प्रवाहचे राष्ट्रीय संयोजक जे. नंदकुमार यांनी टूरिझम प्लाझा येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत या आगामी
आबासाहेब मुजुमदारांचे कार्य दीपस्तंभासारखे – प्रदीप रावत
पुणे : थोर इतिहास संशोधक व कला, साहित्य संगीत क्षेत्रात मोलाचे कार्य करणारे सरदार कै. गंगाधर नारायण उर्फ आबासाहेब मुजुमदार स्मृती पुरस्कार वितरण सोहळा भारत इतिहास संशोधक मंडळात २० सप्टेंबर २०२४ रोजी पार पडला. ज्येष्ठ विचारवंत व माजी खासदार प्रदीपदादा रावत यांच्या हस्ते इतिहास संशोधक महेश तेंडुलकर यांना आबासाहेब मुजुमदारांच्या नावाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
धर्म हीच आपल्या राष्ट्राची जीवनशक्ती – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
तंजावरचे मराठे पुस्तकाचे प्रकाशन पुणे, दि. ९ सप्टेंबर : महाराष्ट्रातील मराठे तमिळनाडूत परके ठरले नाही. कारण स्थानिक समाजजीवनाला त्यांनी समृद्ध केले. आपल्यातील हा एकतेचा धागा धर्मातून येतो. सत्यातून येणारा हाच हिंदू धर्म भारतीय राष्ट्राची प्रेरणा आहे,तीच आपली जीवनशक्ती आहे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. कोथरूड येथील बालशिक्षण मंदिरात
खंडोबा हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे दैवत : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
जेजुरी देवस्थानाकडून मानपत्र प्रदान पुणे : देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे दैवत म्हणजे खंडोबा. जेजूरी गडावर आल्यामुळे आज खऱ्या अर्थाने माझे देवदर्शन झाले आहे. समाज जागृतीचे हे श्रद्धा केंद्र असून, धर्म याच श्रद्धेमुळे टिकला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. सरसंघचालकांनी गुरूवारी (ता.५) जेजूरी येथील श्री मार्तंड देव संस्थानाला
कालसुसंगत वेदज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
सरसंघचालकांच्या हस्ते वेद सेवकांचा सन्मान पुणे : “परंपरेने वेदांचे रक्षण आपण करत आला आहात. आज समाजात श्रद्धा जागृत ठेवण्यासाठी कालसूसंगत वेदज्ञान सर्वसामान्यांपर्यंच पोहचवले पाहिजे”, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. शास्त्रांमध्ये अस्पृश्यतेला स्थान नसतानाही भेदाभेद अमंगळ कशासाठी, असा प्रश्नही सरसंघचालकांनी उपस्थित केला. बालगंधर्व रंगमंदिर येथे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास आणि
छत्रपतीं शिवरायांमुळे देशात राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग : सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे
छत्रपती शिवाजी महाराजांवरील आठ पुस्तकांचे दिल्लीत प्रकाशन नवी दिल्ली : ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताच मनात राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग जागृत होते. गुलामगिरी कशी झुगारून द्यावी याचा आदर्श शिवाजी महाराज होते. त्यांचे जीवन केवळ भारतीयांसाठी नव्हे तर परदेशातीलही गुलामगिरीविरूद्धच्या लढ्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे’, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी व्यक्त केले. नवी दिल्ली येथे
अवघे गर्जे पंढरपूर | चालला नामाचा गजर
राज्यातील लाखो भाविकांच्या आगमनाने फुलली पंढरी पंढरपूर, 16 जुलै : आषाढी एकादशीच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील विविध भागांसह, गोवा, कर्नाटक व तेलंगणा राज्यातील लाखो भाविकांच्या आगमनाने पंढरी नगरी फुलून गेली आहे. यंदा आषाढी नवमीच्या दिवशी सुमारे ५ लाखाहून अधिक भाविक विठ्ठल नगरीमध्ये दाखल झाले असून आषाढी एकादशीच्या दिवशी तर विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान
बारामती, पुरंदर, शिरूरमधील बारवांची स्वच्छता, सेवावर्धीनीच्या स्वयंसेवकांचे श्रमदान
पुणे, दि. १० जुलै : बारामती तालुक्यातील सुपे येथील ऐतिहासिक राखुंडी विहीर आणि स्वयंभू श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरातील पायऱ्या असलेल्या विशिष्ट विहिरींची श्रमदानाने स्वच्छता केल्याने स्वच्छ पाण्याने विहिरी आणि परिसर खुलला आहे. पुण्यातील सेवावर्धिनी संस्थेच्या स्वयंसेवकांनी हा उपक्रम राबविला आहे. सेवावर्धीनीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारव पुनरुज्जीवन व पुनर्वापर प्रकल्पांतर्गत विहिरी स्वच्छतेचा उपक्रम राबवला जात
धर्मवीर गडावर वृक्षारोपण करुन दुर्गदिन साजरा
पुणे, दि. 8 जुलै : ज्येष्ठ कादंबरीकार व दुर्गमहर्षी गो. नी. दांडेकर यांनी ऐतिहासिक दुर्ग वैभवाचा परिचय महाराष्ट्राला करून दिला. म्हणून त्यांची पुण्यतिथी गडप्रेमीं कडून “दुर्गदिन” म्हणून साजरी केली जाते. या वर्षी गोनीदांच्या 25 व्या पुण्यतिथीला इतिहास प्रेमी मंडळ आणि श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीरगड (बहादुर गड) येथे 30 चिंचेच्या झाडांचे वृक्षारोपण