शिक्षण
गोळवलकर गुरुजी विद्यालयात सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन
पुणे, दि. ३ एप्रिल : येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात आज (३ एप्रिल २०२५ ) सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह डॉक्टर आनंद काटीकर यांच्या हस्ते करण्यात आलं. आजच्या विद्यार्थ्यांनी विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन स्वतःमध्ये रुजवून आणि जिज्ञासू वृत्ती जोपासून प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा ध्यास घेतला पाहिजे असं प्रतिपादन डॉक्टर आनंद काटीकर
कुतूहल आणि शैक्षणिक प्रशिक्षण यांचा संगम हा नाविन्याच्या शोधासाठी महत्त्वपूर्ण ठरतो – डॉ. अविनाश कुलकर्णी
डिपेक्स २०२५ : नाविन्यपूर्ण संकल्पनांचे भव्य प्रदर्शन पुणे, दि. ६ एप्रिल : कुतूहल आणि शैक्षणिक प्रशिक्षण यांचा संगम हा नाविन्याच्या शोधासाठी महत्त्वपूर्ण ठरतो. डॉ. कुलकर्णी यांनी नमूद केले की तंत्रज्ञान आणि उद्योग निर्माण करण्याची ही सुवर्णवेळ आहे असे मत डॉ. अविनाश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सृजन ट्रस्ट, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता
भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्राला दिशा देणारे 34 वे Dipex यंदा पुण्यनगरीत आयोजित होणार
पुणे, दि. २८ मार्च : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सुजन व कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजfत डिपेक्स 25, दिनांक 3 ते 6 एप्रिल 2025 रोजी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीच्या मैदानावर संपन्न होणार आहे. डिपेक्स
शिक्षण विभागाकरीता आखण्यात आलेल्या १० कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
पुणे, दि. १७ : मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाकरीता आखण्यात आलेल्या १० कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी; विभागाच्या अधिकाधिक सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ येथे शालेय शिक्षण आयुक्तालयाच्या अधिनस्त असलेल्या विषयाबाबत आढावा बैठकीत त्यांनी सूचना
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व निमा संघटनेचा बिनविरोध विजय
पुणे, दि. २८ जून : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) व निमा विद्यार्थी संघटनेने अभूतपूर्व बिनविरोध विजय मिळवला आहे. या निवडणुकीत सर्व ९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वात उमेदवारांनी आपले यश संपादन केले आणि संपूर्ण विद्यापीठात एकजुटीचा संदेश दिला आहे. या विजयामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि सहशैक्षणिक क्रियाकलापांमध्ये
आषाढी वारी निमित्त विविध मार्गांवर ‘जिज्ञासा’तर्फे आरोग्य सेवा शिबिरांचे आयोजन
पुणे, २७ जून: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचा मानबिंदू आहे. या वारीत येणाऱ्या वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा पुरवण्याचे काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जिज्ञासा आयामाचे विद्यार्थी मागील ९ वर्षांपासून करत आले आहेत. या वर्षीच्या वारीसाठी ठिकठिकाणाहून दिंडींने पंढरपूरसाठी प्रस्थान केले आहे. याही वर्षी जिज्ञासाचे विद्यार्थी वारीत सेवाकार्य करणार असल्याची माहिती अभाविपतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात
आपला देश आणि आपली संस्कृती नेहमीच ज्ञानाभोवती केंद्रित राहिली आहे – पंतप्रधान
पंतप्रधानांनी तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन विद्यापीठाच्या 38 व्या पदवीदान समारंभाला केले संबोधित नवी दिल्ली, २ जानेवारी २०२४ : “आपला देश आणि त्यातील नागरी संस्कृती नेहमीच ज्ञानाभोवती केंद्रित राहिली आहे. आपले तरुण विद्यार्थी ज्ञानाच्या त्या महान ऐतिहासिक परंपरेचा भाग आहेत” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संस्कृतीमध्ये ज्ञानाला असलेले महत्त्व अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
नवयुवकांना सैन्य दलात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे : मिलिंद वाईकर
अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पुणे महानगरतर्फे पुण्यात वीर नारी, वीर पत्नी व वीर मातांसाठी सामाजिक रक्षाबंधन पुणे : “वीर पत्नी,वीर मातांसाठी सामाजिक रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करून अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेने समाजभान ठेऊन एक आदर्श निर्माण केला आहे.सैनिक सीमेवर जीवावर उदार होऊन लढत असतो त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी असे उपक्रम घेतले पाहिजे,”असे प्रतिपादन
एम.ई.एस इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
शिरवळ: एम.ई.एस इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, शिरवळ आणि ग्रामपंचायत शिरवळ यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी जपत शिरवळ परिसरात ७५ हून अधिक देशी वृक्ष लावण्यात आले. आगामी काळात या सर्व वृक्षांच्या संवर्धनाचे नियोजनही शाळेमार्फतच केले जाणार असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती जोशी यांनी दिली. वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमासाठी शिरवळ ग्रामपंचायतीचे शिरवळ विशेष सहकार्य लाभले.