एम.ई.एस इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

शिरवळ: एम.ई.एस इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, शिरवळ आणि ग्रामपंचायत शिरवळ यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी जपत शिरवळ परिसरात ७५ हून अधिक देशी वृक्ष लावण्यात आले. आगामी काळात या सर्व वृक्षांच्या संवर्धनाचे नियोजनही शाळेमार्फतच केले जाणार असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती जोशी यांनी दिली. वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमासाठी शिरवळ ग्रामपंचायतीचे शिरवळ विशेष सहकार्य लाभले.

Read More