लेख
सत्यधर्मरत श्री राघवेंद्र तीर्थ स्वामी
श्री राघवेंद्र स्वामी हे हिंदू धर्मातील मध्व संप्रदायातील एक महान संत आणि तत्त्वज्ञानी होते. १६२४ ते १६३६ या कालावधीमध्ये तमिळनाडूतील कुंभकोणम् येथील श्री मठाचे ते मुख्याधीश होते. द्वैत तत्त्वज्ञानातील ‘न्याय सुधा’ ह्या श्री मध्वाचार्य लिखित ग्रंथावर त्यांनी ‘सुधा परिमल’ हा टीकात्मक संवाद लिहिला. श्री राघवेंद्र स्वामी हे भगवान विष्णूचे भक्त प्रल्हाद यांचे अवतार मानले जातात.
शुद्धाद्वैत वेदान्त व पुष्टीमार्गाचे प्रणेते : वल्लभाचार्य
वल्लभाचार्य (१४७९-१५३१) वल्लभाचार्याचा जन्म इ.स. १४७९ मध्ये आंध्रप्रदेशातील एका तेलगु ब्राह्मण कुटुंबात झाला. या घराण्यात सोमयागाची परंपरा होती. पाचव्या वर्षीच वल्लभांच्या शिक्षणाला सुरुवात झाली. व ‘विष्णुचित्त’ नामक गुरूंकडे त्यांना पाठवलं गेलं. एकपाठी असल्याने तिथलं शिक्षण झपाट्याने पूर्ण करून ते काशीला गेले आणि अकराव्या वर्षी त्यांनी भरतखंडाच्या यात्रेला सुरुवात केली. या यात्रेत ते संपूर्ण देशभर पायी
समानतेचा संदेश देणारे : शंकरदेव
शंकरदेव (१४४९-१५६९) ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी अलिपुखुरी नावाच्या छोट्या गावात इ. स. १४४९ मधे शंकरदेवांचा जन्म झाला. त्या काळात आसाममधील लोकस्थिती अत्यंत अवनत दशेला पोहोचली होती. तिथं छुतिया, कचारी, भूयान/भुइया, आहोम असे चार राजवंश सत्ता गाजवत होते. त्यांच्या आपसातील यादवीमुळे आसामी जीवन दोलायमान झालं होतं. एकीकडे राज्यकर्त्यांचा जुलूम शिगेला पोहोचला होता, तर दुसरीकडे परस्परविरोधी आचारविचार सांगणाऱ्या
वैष्णव परंपरेतील द्वैत वेदान्त मताचे प्रवर्तक : मध्वाचार्य
मध्वाचार्य (११९९-१२९४) कर्नाटकातील दक्षिण कॅनरा जिल्ह्यातील उडुपीपासून आठ मैलांवर असणाऱ्या पाजक नावाच्या क्षेत्री अश्विन शुद्ध दशमीला त्यांचा जन्म झाला. त्यांच्या काळाबद्दल मतभेद आहेत. पण सर्वसामान्यपणे इ.स. ११९९ ते १२९४ असा त्यांचा काळ मानला जातो. आईवडिलांनी त्यांचं नाव वासुदेव असं ठेवलं होतं. त्याचं व्युत्पत्तिकौशल्य इतकं विलक्षण होतं की, या जोरावर अनेक श्लोकांचा व शब्दांचा अर्थ वेगवेगळ्या
महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक : चक्रधर स्वामी
चक्रधर स्वामी (११९४-१२७४) महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णकाळ म्हणावा असा कालखंड आहे. या काळात महाराष्ट्रात नाथ, वारकरी, महानुभाव, लिंगायत इ. धार्मिक संप्रदायांचा उदय झाला. अनेक सिद्ध सत्पुरुष महाराष्ट्रात उदयास आले आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात फार मोलाची भर घातली. त्यामध्ये महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक श्रीचक्रधर यांचा वाटा फार महत्त्वाचा आहे. चक्रधर स्वामींचा कार्यकाल तेराव्या शतकातला आहे. चक्रधर स्वामी
मोक्षाचा खरा मार्ग ज्ञान व कर्म यांपेक्षा भक्तीचाच आहे असं सांगणारे प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्व : रामानुजाचार्य
रामानुजाचार्य (१०१७-११३७) रामानुजांचा जन्म इ. स. १०१७ मध्ये तामिळनाडूतील चिंगलपेठ जिल्ह्यातील श्रीपेरेंबुदूर इथे झाला. जीव आणि जग हे दोन्ही सत्य मानणाऱ्या द्वैतवादाचा पुरस्कार करून रामानुजाचार्यांनी वैष्णव धर्माची ध्वजा सर्वदूर पसरवली. दक्षिणेमध्ये आपल्या सर्वसमावशेक भक्तिसंप्रदायाला आदराचं स्थान मिळवून दिलं. अमोघ वक्तृत्व, अफाट विद्वत्ता आणि असामान्य प्रतिभेच्या जोरावर रामानुजाचार्यांनी विशिष्टाद्वैत विचारधारेचा प्रतिकूल स्थितीतही निष्ठेने प्रचार केला व
चिकित्सा हवीच, पण सकारात्मक बदलांचे कौतुकही व्हावे
गणेशोत्सव नुकताच संपन्न झाला. श्रींच्या विसर्जनाची मिरवणूक नेहमीप्रमाणेच दीर्घकाळ चालली. ‘आपल्याला विसर्जन मिरवणुकीतल्या आवडलेल्या गोष्टी कोणत्या? असा प्रश्न मी विचारला होता. त्यावरच्या बहुतेक सर्व प्रतिक्रिया ‘मिरवणूक संपली’ किंवा ‘बाहेरगावी जाता आलं’ याच पठडीतल्या होत्या. मिरवणुकीतील डीजेंचा दणदणाट दिव्यांचा भगभगाट यांवर सडकून टीका झाली आणि ती व्हायलाच हवी. अन्यथा समाज म्हणून आपण आपला प्रवाहीपणा हरवून बसू
सेवाकार्य परिचय : दुर्गम भागातील सेवाकार्याचा नंदादीप !
भोगावती सांस्कृतिक मंडळ, कसबा तारळे कोल्हापूर… कोल्हापूर म्हणले की समोर येतात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, ऊस शेती, साखर कारखाने व दूधदुभत्यानं समृध्द असलेला जिल्हा… महाराष्ट्रातील असा जिल्हा की ज्याचं दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे. पण या नाण्याची एक दुसरीही बाजू आहे. कोल्हापूरच्या सात डोंगराळ तालुक्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर वसलेल्या वाड्या वस्त्या यांची स्थिती याच्या अगदी उलट आहे.
अभिजात शास्त्रीय संगीताची श्रीमंती मुक्तहस्ते उधळणाऱ्या … मालिनीबाई !
स्व. मालिनी राजूरकर यांना विनम्र श्रद्धांजली ! एक खूपच वाईट बातमी कानावर आली… स्व. मालिनीबाई राजूरकर आपल्याला सोडून गेल्या. हो, मालिनीबाईच. अनेक ज्येष्ठ त्यांचा उल्लेख ‘मालिनीताई’ असा करत असतील, पण आमच्या पिढीच्या दृष्टीने त्या आमच्या आईच्या वयाच्या. आणि त्यांचं गाणंही अतिशय समृद्ध आणि पोक्त. महान विदुषी. जसं, पूर्वीच्या काळचे लोक हिराबाई बडोदेकर, मोगूबाई कुर्डीकर, सरस्वतीबाई
टोमॅटो पिकावरील कीड व रोग एकात्मिक व्यवस्थापन
टोमॅटो पिकांवर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होते. परंतु, हे रोग येऊ नयेत म्हणून पूर्वनियंत्रणाचे उपाय करुन प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. विषाणुजन्य रोगाचा प्रसार प्रामुख्याने फुलकिडे, पांढरी माशी, मावा या किडीमार्फत होतो. विषाणुंचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर औषधांचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे किडीमार्फत होणारा प्रसार थांबविणे हाच एक उपाय आहे. या रोगाची