आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने होणारी ही स्पर्धा १७ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतान इथं पहिला सामना सुरू झाला. यात नाणेफेक जिंकून पाकिस्ताननं फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताचा पहिला सामना शनिवारी पाकिस्तानशी श्रीलंकेतील कँडी इथं होणार आहे. पहिल्या गटात पाकिस्तान, भारत आणि नेपाळ हे देश आहेत तर दुसऱ्या गटात श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांग्लदेशाचा समावेश आहे.